माणूस हा सामाजिक प्राणी आहे. खूप काळ एकांतवासात राहायला लागले, तर आपला मानसिक तोल ढासळू लागतो, हे अनेक शोधांद्वारे सिद्ध झालेले आहे. असे असतानाही अनेकांना इतरांशी संवाद साधणे कठीण जाते.
मुख्य परीक्षेत निबंध अनिवार्य असतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तो विषयाला अनुसरून, मुद्देसूद, विविध चर्चाचा ऊहापोह केलेला असावा. मुख्य म्हणजे त्यात स्वत:ला अधोरेखित करावं. वर्तमानाचं भान ठेवून सुवाच्च अक्षरात निबंध लिहिला तर नक्कीच चांगले गुण मिळतील. मात्र त्यासाठी कसा सराव करणं आवश्यक आहे, याबाबतची थोडक्यात माहिती राज्यसेवा मुख्य परीक्षेत 800 गुणांपैकी 200 गुण - वर्णनात्मक मराठी आणि 100 गुण इंग्रजी असं स्वरूप आहे. या वर्णनात्मक स्वरूपाच्या उत्तरांना नकारात्मक गुणपद्धती नाही. त्यामुळे गुण मिळवण्यासाठी मराठी एक चांगला विषय आहे. परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये मराठी विषयाचा पहिला पेपर असतो. तोच जर चांगला लिहिला गेला तर `चांगली सुरुवात अर्धे अधिक काम जिंकून देते' याचा प्रत्यय येतोच.
नवीन नोकरीत न चुकणारी एक गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यू. रंजनच्या मते, त्याला एखाद्याच्या समोर बसून उत्तरे कशी द्यायची हेच जमत नाही आणि आपण दिलेलं उत्तर बरोबर आहे का? योग्य शब्द वापरले आहेत का? आपल्याकडून नक्की काय अपेक्षित आहे, याचा अंदाजच येत नाही. अर्थात, रंजन असा एकटाच नाही. त्याच्यासारखे प्रश्न असलेले आणि दोलायमान मनस्थिती असलेले अनेक असतात. तसं पाहायला गेलं, तर बहुतांश इंटरव्ह्यूमध्ये ठराविक प्रकारचेच प्रश्न विचारले जातात. आपल्याला हे माहीत असूनही उत्तरांची तयारी केली जात नाही.
परीक्षेची तयारी करताना सर्वप्रथम पुस्तकाचे परिणामकारक वाचन होणे आवश्यक आहे. एक गुणाच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करताना प्रत्येक पाठातील महत्त्वाच्या गोष्टींची नोंद करायला हवी. उदाहरणार्थ, `के 2' हे भारतातील सर्वांत उंच शिखर आहे. किबिथू हे भारताचे पूर्वेकडील परमस्थान आहे. बिकानेर ही आशिया खंडातील सर्वांत मोठी लोकर बाजारपेठ आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न केवळ स्वाध्यायांपुरते मर्यादित नाहीत, तर पाठ्यपुस्तकातील कोणत्याही भागातून विचारले जाऊ शकतात. प्रत्येक पाठात चौकटीत जी माहिती दिलेली आहे, त्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात.
स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. खालील यशाच्या 8 पाय-या
विद्याथ्र्यांना करिअरसाठी कशा प्रभावशाली ठरू शकतात ते पाहा. 1) शुभस्य शीघ्रम कोणत्याही आव्हानाला सामोरे जायचे असेल तर तुमची सुरुवात चांगली, सशक्त असली पाहिजे. या काळात इंग्रजीकडे विशेष लक्ष द्यावे. शिकत असताना बातम्या पाहणे व वाचणे महत्त्वाचे आहे. देश-विदेशातील घडामोडी, या घटनांचे होणारे परिणाम अभ्यासणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये अशा विषयांमधून उमेदवारांचे सर्वंकष ज्ञान तपासले जाते, `शॉर्टकट' किंवा `फास्ट फॉरवर्ड' अभ्यास करून मिळवता येत नाही. मग त्यावर उपाय काय? शाळा, कॉलेजात असल्यापासूनच स्पर्धा परीक्षांकडे करिअर म्हणून पाहायला हवे. येत्या 5 जानेवारीला उपशिक्षणाधिकारी पदासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचा आराखडा आणि सुधारित अभ्यासक्रमांची माहिती देत या परीक्षेची तयारी कशी करावी, यासंबंधीचे मार्गदर्शन महाराष्ट्र
लोकसेवा आयोगाने अनेक परीक्षांच्या अभ्यासक्रमांत बदल केलेला आहे. त्यात उपशिक्षणाधिकारी गट- ब या परीक्षेचाही समावेश आहे. राज्यशास्त्राचा अभ्यासक्रम पाहिल्यास राज्यव्यवस्था आणि शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, नागरी शासन व्यवस्था, सार्वजनिक धोरण हा पूर्वपरीक्षेचा आणि मुख्य परीक्षेला पूर्वपरीक्षेच्या घटकासह जिल्हा प्रशासन शिक्षण व्यवस्था, पक्ष आणि दबावगट, प्रसारमाध्यमे, निवडणूक प्रक्रिया, केंद्र व राज्य सरकारचे विशेष अधिकार व समाजकल्याण कायदे, सार्वजनिक सेवा, सार्वजनिक खर्चावरील नियंत्रण असा व्यापक आहे.
अधिकारी होण्याची सक्षमता उमेदवारात आहे की नाही, याचा अंदाज मुलाखतीत घेतला जातो. उमेदवारामधील आत्मविश्वास, दृष्टिकोन, प्रसंगावधान, चातुर्य, परिस्थिती हाताळण्याची हातोटी, मानसिक कणखरता, संयम, समाजाशी सुसंवाद साधण्याची कला इत्यादीची ही परीक्षा असते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १८६९ उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षक होण्याची संधी यावर्षी दिली आहे.
एमपीएससी आयोगाने काही दिवसांपूर्वी सहाय्यक पदासाठी परीक्षेची जाहिरात दिली. ही परीक्षा २९ सप्टेंबर २०१३ या दिवशी होणार आहे. पण या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण बदलला आहे. पोलिस सबइन्स्पेक्टर, सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक या पदांच्या परीक्षेसाठी यापूर्वी समान अभ्यासक्रम होता. आता तो बदलला आहे.
नक्कीच एमपीएससी कात टाकत आहे. परीक्षांमध्ये प्रश्नातील तोचतोचपणा संपूर्ण वगळला आहे. त्यामुळे अभ्यास साहित्यामध्येदेखील बदल अपेक्षित आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर नमूद केला आहे. त्यातील काही ठरावीक मुद्दयांची आपण चर्चा करूया. शासनाचे विविध विभाग उदा. विक्रीकर, पोलीस इ. विभागात उमेदवारांची निकड भासते, त्या वेळी आयोग विक्रीकर निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक व मंत्रालय सहायक अशा पदांसाठी परीक्षा घेते. अगदी लिपिक या संवर्गासाठीसुद्धा आयोग परीक्षा घेते.
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|